गावाविषयी माहिती

ग्रामपंचायत मांडवा  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील एक गाव प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.सदर ग्रामपंचायत मध्ये मांडवा हा महसूल गाव आहे.मांडवा अंतर्गत बालषेत पाडा ,धावर पाडा ,तळ्याचा पाडा ,गवळी पाडा हे पाडे येतात.मांडवा गावात हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे 942 आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3 , अंगणवाडी केंद्रे 4 व ,सभामंडप-1 अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच  गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हे प्रमुख पिके घेतले  जातात.

मांडवा  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वरसाळे.गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

मांडवा  गाव आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

मांडवा हे गाव वाडा  तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ 1439 हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ४५२  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या९४२ आहे. त्यामध्ये ६९६  पुरुष व ६९०  महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने चारही बाजूला डोंगर असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत गारगाई  नदी असून  ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४२°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ८० ते ९० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

मांडवा .भात शेती प्रामुख्याने केली जाते.

लोकजीवन

मांडवा गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय भात शेती व हंगामी भाजीपाला पिके काही प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह शेळीपालन काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

मांडव्याच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

घटक संख्या
लोकसंख्या १३८६
पुरुष ६९६
स्त्री ६९०
एकूण १३८६

संस्कृती व परंपरा

मांडवा गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे मांडवा गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

गावदेवी  मंदिर – मांडवा गावातील बालषेत पाडा येथे  जागृत गावदेवी मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

हनुमान  मंदिर  – मांडवा गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील हनुमान मंदिर आहे. तसेच मरी आईचे मंदिर आहे.

वाघोबा मंदिर – धावर पाडा येथे वाघोबा मंदिर आहे.

जवळची गावे

मांडवा .गाव तसेच डाहे गाव वाडा  तालुक्यातील पूर्वेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

आसपासची प्रमुख गावे आहेत.

परळी , गारगाव  ,डाहे ,वरसाले